MH CET 2021 Exam New Dates For Absent Students PCB PCM
The new Exam Date will be on 09 & 10 October 2021 for PCB PCM group absent students.
MH CET 2021 Exam New Dates: 9 & 10 October 2021.तीन दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाडा,विदर्भ व राज्यातील इतर भागातील काही विद्यार्थी MH CET 2021 परीक्षेला उपस्थित राहू शकले नाहीत. महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी व पूर परिस्थिती मुळे विद्यार्थ्यांना अपेक्षित परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहता आले नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी MH CET 2021 परीक्षा 09 व 10 ऑक्टोबरला घेण्यात येईल अशी माहिती दिली.
तीस हजार विद्यार्थ्यांना परीक्षेची पुन्हा संधी !! MH CET 2021
राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टी, कोरोना, टाइफाइड इत्यादी साथींचे आजार, वाहतूक वर्दळ, मुसळधार पावसामुळे रस्ते बंद इत्यादी कारणांमुळे बरेच विद्यार्थी महाराष्ट्र राज्य सीईटी परीक्षेला उपस्थित राहू शकले नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी माहिती व उच्च तंत्रशिक्षण मंत्रालयाकडून पुन्हा परीक्षेची संधी देण्यात आलेली आहे. परीक्षा 9 व 10 ऑक्टोबरला होणार आहे.
पीसीबी व पीसीएम या ग्रुपचा उमेदवारांना 01 ऑक्टोबर 2021 ते तीन ऑक्टोबर 2021 या कालावधीत एसएमएस द्वारे अथवा इमेल द्वारे परीक्षेसंदर्भात कळविण्यात येईल.
यासंदर्भात उमेदवारांनी कोणतीही परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही. परीक्षा केंद्राच्या उपलब्धतेत अनुसार नवीन हॉल तिकीट व परीक्षा केंद्रांची माहिती उमेदवारांना लवकरच आपल्या मोबाईलवर अथवा नोंदणीकृत ईमेलवर लवकरच उपलब्ध करण्यात येईल.
यासंदर्भात नवीन हॉल तिकीट व नवीन परीक्षा केंद्राची माहिती महाराष्ट्र राज्य सीईटी सेल लवकरच उपलब्ध करून देणार आहे.
वरील माहितीचे सौजन्य: दैनिक लोकसत्ता
⇓ Follow Our Social Networks for Daily Job Updates ⇓
Join Now | Join Now | Join Now |
follow Us | Subscribe Now | follow us |
Daily Job Updates के लिये @ www.jobchjob.com | www.jobchjob.in | www.jobchjob.net पर विजिट करें | |