संघर्ष कन्या निकिताची यशस्वी भरारी निकीता निर्मळे हिचे MPSC परीक्षेत दैदिप्यमान यश
वयाच्या चौथ्या वर्षी वडिलांचे कॅन्सरनी निधन,पाचवी असताना वडीलांच आयुष्यातून निघून जाणं,एक लहान भाऊ अशा परिस्थितीत मुलांचे पालन पोषक करावे लागणार म्हणून पतींच्या निधनानंतर अनुकम्पा तत्वावर जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे आईनी नौकरी करण्याचा निर्णय घेतला.पण शैक्षणिक जिवन जगत असताना मोठ्या जिद्दीने आईने काही कमी पडू दिलं नाही.प्रवास तसा खुपचं कठीण असा होता.
निकिता दयानंद निर्मळे मूळची तुळजापुर तालुक्यातील सलगरा (दि.)येथील आज हिची संघर्ष यशोगाथा लिहिण्याचा अट्टहास यासाठी की 2018 च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल 9 सप्टेंबर 2019 घोषित झाला, अन निकिता यात उत्तीर्ण होत (सहायक नगर रचनाकार गट-अ) राजपत्रित अधिकारी पद प्राप्त केल्याबद्दल खडतर शैक्षणिक प्रवास प्रेरणादायी असल्याने यशस्वी यशोगाथा,जिल्ह्यात मुलींचा सक्षम अधिकारी होण्याचा टक्का ही वाढतोच आहे.ही गोष्ट अभिमानास्पद वाटते.
उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी प्रशालेत 10 वी पर्यंतचे शिक्षण, दहावीला 95.45 टक्के गुण,उच्च माध्यमिक शिक्षणात लातूर पॅटर्नचा बोलबाला असल्याने 12 वी पर्यंत शिक्षण लातूरला पूर्ण केलं तिथेही 81.50 टक्के गुण प्राप्त, त्यांनतर स्थापत्य जल अभियांत्रिकी (बी.टेक) पदवी शिक्षण नांदेड येथे 60 टक्के गुण घेत पूर्ण केलं,पण यापुढे होता तो स्वतःला सिद्ध करण्यासाठी शैक्षणिक प्रवास, MPSC करण्यासाठी निर्णय पक्का झाला होता,शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात MPSC सेल्फ स्टडी व क्लासेस करण्यासाठी सदाशिव पेठ पुणे गाठले.
उस्मानाबाद सारख्या जिल्ह्यातून MPSC करण्याची जिद्ध घेऊन पुण्यात क्लासेस करणे सोपे नव्हते पण आईने सतत दिलेली साथ अन तिची ऊर्जा पाहून काहीतरी नक्की बनायचे हा आत्मविश्वास मनाशी बाळगून अभ्यासाची तयारी सुरू केली. 2016 पासून अखंडपणे सातत्यपूर्ण नियोजनरित्या केलेला अभ्यास प्रतिवर्षी काहीतरी शिकवत होता,यश खुणावत होत पण मिळत नव्हत. 2016 च्या MPSC परीक्षेसाठी कठोर मेहनत करूनही पूर्व परीक्षेत अपयश आले,मग पुन्हा चिकाटीने तयारी सुरू केली 2017 साली पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झाली पण मुख्य परीक्षेत अपयश आले,हा प्रवास सोपा नव्हता पण हार मानणं अन मागे फिरणं शक्य नव्हते, अन 2018 ला पुन्हा संधीने दार ठोठावले एकाच वेळी दोन परीक्षा उत्तीर्ण होण्याचं भाग्य निकीताला लाभलं पण एकच निर्णय घ्यावा लागतो.
2018 ला अभियांत्रिकी अन नगररचनाकार अशा दोन परीक्षा पास केल्या पण एकाच ठिकाणी मुलाखतीसाठी जावं लागणार होतं अन नगररचनाकार साठी प्रथम बोलावणं आलं अन मानसिकता स्ट्रॉंग बनवत आईचे कष्ठ नजरेत साठवून होतेच त्याला साथीला घेत मुलाखतीसाठी यशस्वीपणे सामोरे गेली.अन जीवनातील तो आनंदी दिवस होता 9 सप्टेंबर 2019 निकाल जाहीर झाला अन आई तुळजा भवानी मातेचे आशीर्वाद अन सोबतच जन्मदात्या आईला ही अभिमान वापरावा असा क्षण आला अन कु. निकिता दयानंद निर्मळे यांनी MPSC उत्तीर्ण होत सहायक नगररचनाकार (गट-अ) अधिकारी पदावर आपले नाव कोरले,तुळजापुर सह उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव रोशन केले.
कसोटी मातृत्वाची जिद्ध लेकीची:
मुलगी निकिता 4 वर्षाची तर मुलगा प्रतीक अवघ्या 10 महिन्याचा असताना पतीचे निधन,पतीच्या निधनानंतर 2004 पासून जिल्हा परिषद मध्ये लिपिक पदावर काम करत निकीता अन प्रतीक या दोघांचा सांभाळ अन त्यांचे आवडीनुसार शिक्षण ही कसरतच होती आज मुलीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने मनस्वी खुपच आनंद वाटतो आहे,आजवर केलेल्या परिश्रमाचे फलित मिळाले,कुटुंबातील कर्ता पुरुष गमावल्यानंतर समाजात यशस्वी पालक होण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो,पण जिद्ध,मेहनत, व प्रामाणिकपणा सोबत असेल तर नक्की आनंद मिळतो.
श्रीमती कविता दयानंद निर्मळे
{सहा.लेखा अधिकारी जि.प.उस्मानाबाद}
सौजन्य – माझी बातमी
जॉबच जॉब टीम तर्फे निकिता निर्मळे ला खुप खुप शुभेच्छा
Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com | www.jobchjob.in | www.jobchjob.net वर भेट द्यावी.